गिर्ये केंद्र अंतर्गत केंद्रस्तरीय रंगभरण स्पर्धा संपन्न

विजयदुर्ग (प्रतिनिधी ) : विघ्नहर्ता ग्रुप, विजयदुर्गचे संस्थापक शंकर सागवेकर पुरस्कृत गिर्ये केंद्रांतर्गत नुकत्याच केंद्रस्तरीय रंगभरण स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये गिर्ये केंद्रातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या. गिर्ये केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.अशोक जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धा एकूण चार गटात संपन्न झाल्या. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला. इयत्ता पहिली – दुसरी या गटात ईश्वरी महेंद्र देवगडकर, शाळा गिर्ये कोठार, इकरा सरफराज काजी, शाळा विजयदुर्ग उर्दू, गौरेश सुरज टुकरुल, शाळा रामेश्वर कोलवाडी, अर्णव विशाल बाणे, शाळा पुरळ हुर्शी, आदित्य बाळासाहेब दहिफळे, शाळा विजयदुर्ग नं.१ यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. इयत्ता तिसरी ते चौथी या गटात चिन्मय विष्णू टुकरूल, शाळा रामेश्वर कोलवाडी, आम्रपाली संतोष गिरकर, शाळा विजयदुर्ग नं.१, नितेश निलेश मुळम, शाळा पुरळ कोठार, ओवी शितल देवरकर, शाळा रामेश्वर, चिन्मय विनोद आदम, शाळा रामेश्वर कोलवाडी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले.

इयत्ता पाचवी ते सहावी या गटात रुद्र सुशील मुंबरकर, गिर्ये हायस्कूल, मुनज्जा मुजम्मिल धोपावकर, शाळा विजयदुर्ग उर्दू, सिंचल प्रवीण राघव, शाळा पुरळ हुर्शी, अरफान सज्जाद चौगुले, शाळा गिर्ये उर्दू, असिफा महमूद चौगुले, शाळा गिर्ये उर्दू यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. इयत्ता सहावी ते आठवी या गटात सानिका गुरुनाथ घाडी, गिर्ये हायस्कूल, झोया आदिल डोंगरकर, कोकण उर्दू हायस्कूल विजयदुर्ग, सबा सज्जाद चौगुले, कोकण उर्दू हायस्कूल विजयदुर्ग, गार्गी संकल्प मालवणकर, गिर्ये हायस्कूल, अरबाज जावीद शहा, कोकण उर्दू हायस्कूल विजयदुर्ग यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. विजेत्या सर्व स्पर्धकांना विघ्नहर्ता ग्रुप विजयदुर्गचे शंकर सागवेकर यांच्या वतीने आकर्षक बक्षिसे देण्यात आली. त्याचबरोबर सहभागी सर्व स्पर्धकांना देखील बक्षीस देण्यात आली. यावेळी गिर्ये केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक जाधव आणि कलाशिक्षक श्री. पांढरे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गिर्ये केंद्रातील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.शिर्षक : गिर्ये केंद्र अंतर्गत केंद्रस्तरीय रंगभरण स्पर्धा संपन्न