फोंडाघाट | कुमार नाडकर्णी —
मुंबई विद्यापीठ अंतर्गत संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे पार पडलेल्या ५८ व्या सांस्कृतिक युवा महोत्सवात फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश मिळवले.वकृत्व स्पर्धेत महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. निता धुरी हिने आपल्या प्रभावी वक्तृत्वाने प्रथम क्रमांक पटकावत महाविद्यालयाचा गौरव वाढवला.
तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागातील आदिवासी परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या कोरकू लोकनृत्याला तृतीय क्रमांक मिळाला. या नृत्याविष्कारात रिया मेस्त्री, सारिका येंडे, प्रिया मेस्त्री, कोमल जोईल, गौरेश मेस्त्री, निर्वाण कांबळे, करण गुरव आणि पार्थ गिरकर यांनी सहभाग घेतला. या संघाला युवा महोत्सव विभाग प्रमुख डॉ. संतोष रायबोले यांचे मार्गदर्शन आणि कोरियोग्राफर श्री. राकेश शिर्के यांचे विशेष प्रशिक्षण लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे, तसेच संस्थेचे पदाधिकारी वी संचालक महा विद्यालय विकास समिती, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांचेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…










