तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत राजश्री कोदे प्रथम!

मसुरे | झुंजार पेडणेकर
मालवण तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाच्या निमित्त आयोजित पाककृती स्पर्धेत राजश्री कोदे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, महिला आर्थिक विकास महामंडळ (सिंधुकन्या कट्टा) व जय हनुमान मंदिर ट्रस्ट, आनंदव्हाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर महोत्सवाचे आयोजन आनंदव्हाळ येथे करण्यात आले होते. पाककृती स्पर्धेत 30 स्पर्धकांनी सहभाग घेतला. यातून प्रथम 3 विजेते व 7 उत्तेजनार्थ विजेते घोषित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिक, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

विजेते पुढील प्रमाणे आहेत.प्रथम – राजश्री कोदे, चिंदर – शेवगा लाडू.द्वितीय – रिया मराळ, आंबडोस – कुड्याच्या शेंगाचे लोणचे. तृतीय – निता ओटवणेकर, देऊळवाडा-मालवण – मिक्स रानभाजी चीजबॉल. चतुर्थ – तृषा गावडे, चौके – गुळवेल डोसा. पाचवा – रत्ना लब्दे, माळगाव – मिक्स रानभाजी कटलेट. सहावा – पूजा धुरी, कोळंब – निवडुंग वडी. सातवा – मंजुषा मेस्त्री, देवली – चवई फुलाचे कटलेट. आठवा – प्रतीक्षा हळदणकर – खरशिंगाची भाजी.
नववा – स्नेहल चव्हाण, देवली – कणककोंबाची भाजी.

दहावा – दिव्या मिसाळ, कुंभारमाठ. यावेळी कणकवली उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषि अधिकारी अमोल करंदीकर, जिल्हा समन्वयक अधिकारी नितीन काळे, मंडळ कृषि अधिकारी आचरा हुसेन आंबर्डेकर, मंडळ कृषि अधिकारी पोईप दशरथ सावंत, सरपंच आनंदव्हाळ श्रीम. रश्मी टेंबूलकर, सरपंच कातवड श्रीम. प्रतीक्षा हळदणकर, उपकृषी अधिकारी धनंजय गावडे, सिताराम परब, श्रीपाद चव्हाण, श्रीम. राणी थोरात, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, मालवण श्री निलेश गोसावी, व्यवस्थापक सिंधुकन्या CMRC श्रीम. गीता चौकेकर, पाककला परीक्षक श्रीम. कविता तळेकर, रानभाजी तज्ञ मार्गदर्शक रामचंद्र शृंगारे तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कृषि सेवक श्रीम. स्नेहा खोत यांनी केले तर आभार उपकृषी अधिकारी श्री धनंजय गावडे यांनी मानले.