गणेश भक्तांची वरुण राजाला प्रार्थना
चिपळूण : संतोष कुळे
गणेश उत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण सुद्धा दिसून येत आहे. परंतु मागील आठवड्यामध्ये तुफान पाऊस बरसला होता. सगळीकडे पाणीच पाणी झाले होते .त्यामुळे गणेश उत्सवामध्ये असाच वरुण राजा बरसला तर आनंदावर विरजण पडेल. त्यामुळे घरी बाप्पाचे आगमन होत आहे. तेव्हा ये वरुण राजा तू या गणपती सणात विश्रांती घे.. जोरदार बरसू नको..अशी प्रार्थना आता गणेश भक्त करत आहेत.
दि. 15 ऑगस्ट नंतर दोन-तीन दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती. सगळीकडेच पाणीच पाणी झाले होते. काही ठिकाणी पाणी भरले होते. जनजीवन विस्कळीत झाले होते. काही शहरात आणि ग्रामीण भागात सुद्धा या जोरदार पडलेल्या पावसामुळे काही दुर्घटना घडल्या होत्या. त्यामुळे गणेश उत्सवामध्ये जर असाच पाऊस पडला तर आनंदावरती पाणी फिरले. अशी गणेश भक्तांची मनातून धारणा आहे. मात्र गेले दोन दिवस पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतल्याचे दिसून येते. दिवसातून एखाद्या दोन-तीन सरी बरसतात. त्याच्यामुळे गणेश भक्त सुद्धा मनातून खुश झाले आहेत. काही मुंबईकर आता गावच्या दिशेने रवाना झाले तर काही गावी पोहचले आहेत. तेव्हा त्यांचा प्रवास सुद्धा पाऊस नसल्यामुळे सुखकर होत आहे. असाच पाऊस जर गणपतीचे आगमन घरी झाल्यानंतर या गणेशोत्सवात कमी राहिला तर निश्चितच गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित होईल. या उत्सवामध्ये प्रत्येक गणेश भक्त आनंदी असेल असे गणेश भक्तांचे मत आहे.
त्यासाठीच गणेश भक्त हे वरुण राजाला प्रार्थना करून सांगत आहे की, आमच्या घरी बाप्पाचे आगमन होत आहे. या काळात वरुण राजा तू सुद्धा थोडी विश्रांती घे आणि आम्हाला बाप्पा घरी आल्यानंतर त्याची यथा सांग पूजाअर्चा आरती करून या बाप्पाची सेवा करू दे. ही सेवा करताना आम्हाला आमची लोककलेचा संस्कृती म्हणजे जाखडी, टिपऱ्या, भजन या कलेचा सुद्धा आनंद घेता येईल. अशी गणेशभक्त यांची वरुण राजाला प्रार्थना आहे. आता बाप्पा सर्व गणेश भक्तांच्या मनातील गाऱ्हाणे ऐकून वरुण राजाला विश्रांती घ्यावयास सांगणार की वरुण राजा बरसणार यावर गणेश भक्तांचा आनंद अवलंबून असणार आहे.












