वागदे येथे महामार्गावर बलेरो पिकअप पलटी

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर वागदे पेट्रोल पंपांनजिक गोवा येथून रत्नागिरीच्या दिशेने जाणारा बलेरो पिकअप पलटी झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ४:३० वा. च्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवारी सायंकाळी गोवा येथून रत्नागिरीच्या दिशेने जाणारा मच्छी वाहतूक करणारा बलेरो पिकअप टेम्पो वागदे येथील पेट्रोल पंपानजीक डाव्या बाजूने पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. बलेरो पिकअप चे ब्रेक मध्ये अचानक बिघाड झाल्याने चालकाचे बलेरोवरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले. स्थानिक नागरिकांनी व परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पलटी झालेला टेम्पो उभा केला. दरम्यान टेम्पो पलटी झाल्याने महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.