UPDATE: नाचणे येथे झालेल्या खुनाचे प्राथमिक कारण आले पुढे

रत्नागिरी : प्रतिनिधी

शहरातील शांतीनगर येथे झालेल्या खुनाचे प्राथमिक कारण पुढे आले आहे

वडिलांनी केलेल्या कर्जाला कंटाळून मुलाने आईचा सुऱ्याने खून केला

त्यानंतर स्वतः च्या हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

ही घटना मंगळवार 26 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली.

पूजा शशिकांत तेली (45,रा. शांतीनगर एकता वसाहत, रत्नागिरी) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

तिच्यावर तिचा मुलगा अनिकेत तेली (25) याने धारदार सुऱ्याने वार करून खून केला.