रोटरी स्कूलची कु. विधी दिपक गोरे ’खेलो इंडिया’ तायक्वॉंडो स्पर्धेची पदक विजेती

खेड – ( प्रतिनिधी )
रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी एरवडे क्रीडा संकुल पुणे येथे झालेल्या तिसर्‍या महिला अस्मिता खेलो इंडिया तायक्वाँडो स्पर्धेत रोटरी स्कूलच्या कु. विधी दिपक गोरे हिने कांस्य पदक पटकावले.
कु. विधी दिपक गोरे ही इ.11 वी मध्ये शिकत असून तिला तायक्वॉंडो खेळाची खूप आवड आहे. सन 2023 मध्ये राष्ट्रीय ‘खेलो इंडिया’ तायक्वॉंडो स्पर्धेत सुवर्ण पदक व 2024 मध्ये रौप्य पदक पटकावले. तिने आजवर 4 राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवून सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. तसेच तिने यापूर्वी देखील महाराष्ट्र राज्य तायक्वॉंडो स्पर्धेमध्ये व खेलो इंडिया स्पर्धा निवड चाचणीमध्ये सुवर्ण पदक पटकावून आपले व रोटरी स्कूलचे नाव गौरविले होते.
 भविष्यामध्ये आशियाई युथ गेम्स् मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचा मानस उरी बाळगून त्याकडे तिची यशस्वी वाटचाल सुरू आहे. तिच्या या यशामुळे सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कु. विधीला क्रीडाशिक्षक व तायक्वॉंडो प्रशिक्षक श्री. कृणाल चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु. विधी गोरे हिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.