जि.प. कादवड तांबडवाडी प्राथमिक शाळा क्र.२ ला दोन सिलिंग पंखे भेट
चिपळूण (प्रतिनिधी) : समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली एक पाऊल समाजासाठी माझा गाव,माझी जबाबदारी हे मिशन घेऊन पुढे जात आहे. सेवक माजी सैनिक संभाजी चव्हाण, विद्यमान सैनिक इकबाल चिपळूणकर, राजेश कोकरे, विजय खरात, साद कडवेकर, सामाजिक सेवक प्रसाद वनगे, हेमंत जाधव, समीर कदम, संदीप मोहिते, अनिल पिनगे, सुधीर मोरे यांची नि:स्वार्थ सेवा व आर्थिक सहकार्य समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून अनेक चांगले उपक्रम प्रामाणिकपणे राबविण्याचा आनंद घेत आहेत. सेवा हाच खरा माणुसकीचा धर्म आहे. या ग्रुपकडून जि.प. कादवड तांबडवाडी प्राथमिक शाळा क्र.२ ला दोन सिलिंग पंखे भेट देण्यात आले.
मुख्याध्यापक यशवंत वनगे सर यांनी पत्राद्वारे समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपला दोन सिलिंग पंख्याची मागणी करण्यात आली होती. शाळेच्या पत्राची दखल घेऊन समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुप यांसकडून दोन सिलिंग पंखे सामाजिक सेवक नितीन शिगवण याच्या हस्ते भेट देण्यात आले. स्वाती शिगवण यांनी पाटी, पेन्सिल तर डाऊ केमिकल कंपनी लोटे यांच्या तर्फे वह्या वाटप करण्यात आल्या. शाळेला भेट वस्तू देतेवेळी सती चिंचघरी सरपंच अमित आंग्रे, डाऊ केमिकल लोटे रवींद्रे गवळी,मंगेश शिगवण, वसंत गोरखे,दिनेश सकपाळ,संतोष सकपाळ, सौ.अश्विनी दुर्गवले, सौ. हर्षाली मोरे, सौ. संगीता खरात, अंगणवाडी सेविका सौ. अंकिता शिंदे, सौ. साक्षी शिगवण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक यशवंत वनगे यांनी मानले.