राजापूर (वार्ताहर): शहरातील कोंढेतड येथील प्रतिष्ठीत नागरिक व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सेवानिवृत्त शाखाधिकारी अब्दुलसत्तार कासिम जैतापकर (76) यांचे गुरूवार दि. 28 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान उपचार सुरू असताना गुरूवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. जैतापकर हे जिल्हा मध्यवर्ती बँकेतून शाखाधिकारी पदावरून निवृत्त झाले होते. एक हरहुन्नरी व मितभाषी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांच्या कोंढेतड येथील निवासस्थानी धाव घेत कुटुंबियांचे सांत्वन केले. कोंढेतड भागातील सामाजिक कार्यातही त्यांचा कायम सक्रीय सहभाग असे.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी,सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.













