पाणी प्रश्न हा राजकारण विरहित असला पाहिजे :आ नितेश राणे

विजयदुर्ग प्रादेशिक नळ योजनेसाठी शिवसेना भाजपा सरकारने 94 कोटी रुपयाचा निधी दिला आहे एवढे मोठे विकास काम सेना-भाजपची सत्ता आल्याने शक्य झाले आहे या योजनेतून विजयदुर्ग सह 17 गावांना पाणीपुरवठा होणार आहे पाणी प्रश्न हा राजकारण विरहित असला पाहिजे. ग्रामपंचायतीवर सत्ता कोणाची हे न पाहता पाण्यासाठी एकत्र येऊन या योजनेतील अडचणी दूर करूया व नागरिकांना पाणी देऊ या असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले

 

 

विजयदुर्ग प्रादेशिक या नळ योजनेचे नूतनीकरण मंजूर झाले आहे या नूतनीकरणाचा शुभारंभ करण्यात आला यासाठी भूमिपूजन आज करण्यात आले या भूमिपूजनासाठी आमदार नितेश राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते

यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर अमोल तेली भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे मनोज रावराणे शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळस्कर

संबंधित पाणी योजना लाभार्थीं ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच यासाठी उपस्थित होते

 

आमदार नितेश राणे यांनी यावेळी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली आता खासदार विनायक राऊत पुन्हा भूमिपूजन करतील व या कामाचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करतील निधी मंजूर करून आणण्याचे धाडस त्यांच्यात नाही सुरुवातीची दोन वर्षे कणकवली मतदारसंघ म्हटल्यावर विकास कामांवर उद्धव ठाकरे फुले मारत असत आमचे सरकार आले म्हणून आज एवढा निधी आपण आणू शकलो याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचे आभार मानले

 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी शुभेच्छा देताना आमदार नितेश राणे यांच्यासारखा आमदार लाभणे या मतदारसंघाचे सौभाग्य असून विकासाची गंगा आमदार नितेश राणे आणू शकतात अशा शब्दात आमदार नितेश राणे यांचे कौतुक केले

 

कार्यक्रमाला शुभेच्छा देताना विलास साळसकर यांनी जिल्हा परिषदे कडून व सरपंचांकडून येणाऱ्या जलजीवन च्या कामातील अनेक अडचणी सविस्तरपणे मांडल्या व आमदा नितेश राणे यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आलेला निधी योग्यरीत्या मार्गी लावून सर्वांना पाणी देणे याकडे गावच्या सरपंचासह सर्व यंत्रणेने लक्ष देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली

 

माजी सभापती रवी पाळेकर यांनी या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आमदार नितेश राणे यांनी ही पाणी योजना चालू राहण्यासाठी केलेल्या कामाचे सविस्तर माहिती उपस्थितांना दिले

 

जीवन प्राधिकरण चे अधिकारी राजेंद्र मिस्त्री यांनीही या योजनेबाबत सांख्यिकी माहिती उपस्थिती त्यांना दिली आभार प्रदर्शन रवी पाळेकर यांनी केले