अणसूर ग्रामपंचायत चा उपक्रम : प्रदूषण टाळण्याचा दिला संदेश
वेंगुर्ले l दाजी नाईक :गणेशोत्सव काळात पूजा विधीतील फुले, सजावटीतील मकर साहित्य, प्लास्टिक आदी निर्माल्य नदीमध्ये न फेकता ते एकत्र करण्यासाठी अणसूर ग्रामपंचायत च्या वतीने गणेश विसर्जन च्या वेळी “निर्माल्य कलश” लावण्यात आला. त्याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद देत निर्माल्य एकत्र कलशामध्ये गोळा करून प्रदूषण टाळण्याचा संदेश दिला.
अणसूर ग्रामपंचायत चे सरपंच सत्यविजय गावडे आणि ग्रामपंचायत च्या वतीने गावात स्वछते कडे जास्त भर देते. मुखमंत्री पंचायत राज अभियाना मध्ये पूर्ण तयारी निशी ग्रामपंचायत उतरली आहे. त्याची पूर्व तयारी आतापासूनच सुरु केली आहे आणि या अभियाना साठी अणसूर ग्रामपंचायत ची संपूर्ण टीम सहकार्य करत आहे.
या अभियानात अणसूर ग्रामपंचायत नक्की यशस्वी होईल. संपूर्ण गावातील ग्रामस्थ या साठी चांगले सहकार्य करत आहेत. निर्मल्य एकत्र करणे या उपक्रमासाठी सुद्धा ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. गावातील घरा घरातील कचरा, गणपतीच्या माटविला बांधलेले सामान, डेकोरेशन चा कचरा, निर्माल्य हे नदीत न फेकता एकत्र जमा करुन त्याचे वर्गीकरण करण्यात आले. या वर्गीकरण केलेल्या कचऱ्याचे खत निर्मिती साठी वापर करण्यात येणार आहे. गेली दोन वर्ष हा उपक्रम ग्रामपंचायत च्या वतीने राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला ग्रामस्थ चांगले सहकार्य करत आहे, तसेच गावात सुद्धा वर्षातून दोन ते तीन वेळा स्वच्छता मोहीम राबविली जाते. या स्वच्छते साठी गावातील ग्रामस्थ, महिला यांचे चांगले सहकार्य मिळते. त्यामुळे ग्रामपंचायत च्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.












