रत्नागिरी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन रत्नागिरी शहरातील अनेक तरुणांनी आज मनसेमध्ये प्रवेश केला. मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मनसे शहर संघटक अमोल श्रीनाथ यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश पार पडला.
उपशाखा अध्यक्ष प्रसाद भाटकर यांच्या प्रयत्नातून हा पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळे रत्नागिरी शहरात मनसेची ताकद वाढण्यास मदत होईल, असे अमोल श्रीनाथ यांनी सांगितले.
यावेळी चंदन शिवलकर, नितीश पाटील, वेदराज मयेकर, तेजस बेर्डे, पार्थ नागवेकर, नंदादीप मोरे यांच्यासह अनेक तरुणांनी पक्षात प्रवेश केला.
या पक्षप्रवेशासोबतच काही पदांची नियुक्तीही करण्यात आली. प्रसाद भाटकर यांची उपशाखाध्यक्ष आणि गौरव खेडेकर यांची उपविभाग अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव, शहर संघटक अमोल श्रीनाथ, मनसे महिला उपशहर अध्यक्षा द्वारकाताई नंदाने, तालुका सचिव अभिलाष पिलणकर, उपशहर अध्यक्ष राहुल खेडेकर, उपशहर अध्यक्ष राजेश नंदाने, विभाग अध्यक्ष अक्षय सुतार, सोहम पिलणकर, संजय आग्रे, आकाश फुटक यांच्यासह इतर महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.











