तिहेरी खून प्रकरणात तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ

रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील खंडाळा येथे नुकत्याच उघड झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात तिघांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे. तर एका आरोपीला न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच मिरजोळे येथील भक्ती मयेकर या या तरुणीच्या खुनाचा उलगडा झाला होता. भक्ती मयेकर हिच्या खुनाचा उलगडा होताच एका पाठोपाठ एक तीन खून झाल्याचे निष्पन्न होताच संपूर्ण जिल्हा हादरला. भक्ती मयेकर हिचा खून करून हैवान दुर्वास पाटील याने तिचा मृतदेह आंबा घाट येथे फेकला होता. या खुनाचा उलगडा झाल्यानंतर दुर्वास पाटीलने भक्ती मयेकर हिच्यासह अन्य दोघांचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले. तिघांपैकी एकाचा मृतदेह अद्यापही आढळून आलेला नाही. आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने दुर्वास पाटील याने दोन ही मृतदेहांची विल्हेवाट लावल्याचे समोर आले.
अटक करण्यात आलेल्या चारपैकी दुर्वास पाटील, सुशांत नरळकर, विश्वास पवार यांची पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपुष्टात आल्याने त्यांना न्यायालय समोर हजर करण्यात आले. न्यायालयानं या तिघांच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ केली असून चौथा आरोपी निलेश भिंगार्डे याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे