रत्नागिरी | प्रतिनिधी
सर्वांना सूचित करण्यात येते की, दिनांक 30/06/2023 रोजी पावसामुळे राज्य महामार्ग क्रमांक 166 पाली ते साखरपा गाव दरम्यान नाणीज येथील माध्यमिक शाळेसमोरील रस्ता खचलेला आहे त्यामुळे सदरचा राज्य महामार्ग रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत बंद करण्यात आलेला आहे व पर्यायी मार्ग म्हणून
1) मुंबई कडून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक पाली पासून लांजा – दाभोळ मार्गे कोल्हापूर दिशेने वळविण्यात आलेली आहे
2) कोल्हापूर कडून येणारी वाहतूक दाभोळ फाटा – लांजा – मार्गाने वळविण्यात आलेली आहे