दोडामार्ग l प्रतिनिधी :नवहोशी ठाकर समाज कला क्रीडा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रविवार, दिनांक ०३ मे २०२६ रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दिवसभर भक्तीमय वातावरणात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
श्री सत्यनारायण महापूजेचा प्रारंभ होईल. महापूजेनंतर सर्व भाविकांसाठी ‘महाप्रसादाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
संध्याकाळी ५.०० वाजता सुप्रसिद्ध भजन मार्गदर्शक उदय गवस यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न होईल.
रात्रीचे खास आकर्षण दशावतारी नाट्यप्रयोगाने कार्यक्रमाची सांगता रात्री ठीक १०.०० वाजता भव्य पौराणिक दशावतारी नाटकाने होईल. सागर नाईक झरेबांबर प्रस्तुत ‘अमृत मणी प्रतिशोध’ हा चित्तथरारक महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
तरी या सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी कोनाळ कट्टा परिसरातील सर्व समाज बांधवांनी आणि कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नवहोशी ठाकर समाज कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष यांनी केले आहे.












