प्रारूप विकास आराखडा नामंजूर!!

कसई दोडामार्ग नगरपचायत विशेषसभा
शहरातील नागरिकांना न्याय देण्यास सक्षम: चेतन चव्हाण

दोडामार्ग – प्रतिनिधी

कसई – दोडामार्ग नगरपंचायतचा जो प्रारूप विकास आरखड्याचा ठराव घेण्यात आला होता तों त्याचाच कालावधीत घेण्यात आला होता. आता तेच मतांची बेरीज करून विरोध करत आहेत. आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. ते फक्त शहरातील नागरिकांना विनाकारण चुकीची माहिती देत आहेत. पण आपण शहरातील नागरिकांना न्याय देण्यास सक्षम आहोत. तसेच नुकत्याच झालेल्या विशेष सभेत त्यांच्यासह उपस्थित सर्व नगरसेवकांनी प्रारूप विकास आराखडा रद्द करण्यास आपली सहमती दिली असून तसा ठराव मांडण्यात आला आहे असे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

कसई – दोडामार्ग नगरपंचायतच्या सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत उपनगराध्यक्ष देविदास गवस, नगरसेवक नितीन मणेरीकर, रामचंद्र मणेरीकर,तसेच उबाठा शिवसेनेचे नगरसेवक चंदन गावकरही उपस्थित होते. यावेळी चव्हाण बोलताना म्हणाले की, दोडामार्ग शहराचा प्रारूप विकास आराखडा हा लोकसंख्या वीचारात न घेता केला आहे. सध्याची लोकसंखे विचार करता कसई – दोडामार्ग नगरपंचायत वाढत चालली आहे. त्यामुळे केलेला विकास आराखडा रद्द करण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवकांनी या आराखाड्याला नामंजुरी दिली आहे. तसा ठरावही करण्यात आला आहे. त्यामुळे दोडामार्ग शहराची आता ची नवीन लोकसंख्या करून नवीन आराखडा करावा अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

विकास आराखड्याच्या विशेष सभेवेळी नगरसेवक संतोष नानचे, रामचंद्र ठाकूर, सोनल म्हावळणकर यांनी सभा त्याग करून गेले. त्यांना दोडामार्ग विकास आराखड्याचे गांभीर्य नाही आजची जी सभा होती ही शहरातील नागरिकांच्या हिताच्या दृष्ठिने होती. त्यांना लोकांचे हीत साधायचे नसेल म्हणून ते सभा सोडून गेले. लोकांची दिशा भूल करण्यासाठी ते गेले असतील. त्यांना जर गांभीर्य असले असते तर ते थांबले असते असेही चव्हाण म्हणाले.
श्री. चव्हाण पुढे म्हणाले की, आपण
याबाबत वरिष्ठा कडे दोडामार्ग दौऱ्यावर आले असता त्यावेळी त्यांच्या कानावर शहर प्रारूप विकास आराखड्याच्या विषय घातला होता. त्यावेळी त्यांनी हा विषय मार्गी लावतो असे सांगितले. त्याशिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याही निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे हा विकास आराखडा रद्द होऊन नव्याने नागरिकांच्या हरकतींचा विचार करून कोणाही नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही ही बाब लक्षात घेऊन नवीन आराखडा तयार करण्यात येणार आहे असेही श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.