कणकवली : दारूच्या नशेमध्ये मुलानेच जन्म देत्या आईचा खून केल्याची घटना कणकवली तालुक्यातील वारगाव सोरप – सुतारवाडी येथे घडली. बुधवारी रात्री ११:३० वा.च्या सुमारास वारगाव येथील राहत्या घरी घडलेल्या या घटनेत आई प्रभावती रामचंद्र सोरप ( वय ८०) ही जागीच मृत्युमुखी पडली. याघटनेप्रकरणी मृत वृद्धमहिलेचा मुलगा आरोपी रवींद्र रामचंद्र सोरप ( वय ४५ ) याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे भिकू रामचंद्र सोरप यांच्या फिर्यादीनुसार संशयित आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आज आरोपी रविंद्र सोरप याला न्यायालयात हजर केले असता पोलीस तपासाच्या दृष्टीने अजून काही बाबी तपासाच्या आहेत, तसेच तपास कामी आरोपीची मदत लागणार असल्याने न्यायालयाने पाच दिवसांचा पोलीस कोठडी सुनावली आहे.
आईच्या खुनाप्रकरणी आरोपी मुलाला पाच दिवसांची पोलीस कोठडी
कणकवली : दारूच्या नशेमध्ये मुलानेच जन्म देत्या आईचा खून केल्याची घटना कणकवली तालुक्यातील वारगाव सोरप – सुतारवाडी येथे घडली. बुधवारी रात्री ११:३० वा.च्या सुमारास वारगाव येथील राहत्या घरी घडलेल्या या घटनेत आई प्रभावती रामचंद्र सोरप ( वय ८०) ही जागीच मृत्युमुखी पडली. याघटनेप्रकरणी मृत वृद्धमहिलेचा मुलगा आरोपी रवींद्र रामचंद्र सोरप ( वय ४५ ) याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे भिकू रामचंद्र सोरप यांच्या फिर्यादीनुसार संशयित आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आज आरोपी रविंद्र सोरप याला न्यायालयात हजर केले असता पोलीस तपासाच्या दृष्टीने अजून काही बाबी तपासाच्या आहेत, तसेच तपास कामी आरोपीची मदत लागणार असल्याने न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.












