रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा : पीकनिहाय खबरदारी कोणती घ्याल?

कृषी विद्यापीठाचा सल्ला 

रत्नागिरी | प्रतिनिधी 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांचा इशारा :
१४, १५ व १६ सप्टेंबरला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता.
शेतकऱ्यांनी पीकनिहाय पुढील काळजी घ्यावी :

भात (खरीप)
  • १३ सप्टेंबरपूर्वी खतांचा वापर व कीटकनाशक/बुरशीनाशक फवारणी पूर्ण करा.

  • बांध मजबूत करून शेतात ५–१० सेंमी. पाणी साठवा.

  • गवत काढून तणमुक्त ठेवा.

  • निळ्या भुंग्यासारख्या किडीवर वेळेवर लक्ष ठेवा, पावसाची उघडीप मिळाल्यावरच फवारणी करा.

नागली / वरी (खरीप)
  • मुसळधार पावसामुळे साचलेले पाणी त्वरित काढून टाका.

नारळ
  • १३ सप्टेंबरपूर्वी खत व कीटकनाशकांची फवारणी करा.

  • बागेत पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्या.

  • कोंब कुज रोगावर पावसाची उघडीप मिळाल्यावर १% बोर्डो मिश्रणाची फवारणी करा.

आंबा / काजू
  • १३ सप्टेंबरपूर्वी फवारणी पूर्ण करा.

  • नवीन लागवडीच्या रोपांच्या बुंध्यात पाणी साचू देऊ नका.

  • फांदीमऱ्यावर कॉपर ऑक्सीक्लोराइड किंवा ०.१% बोर्डो मिश्रण फवारावे.

सुपारी
  • खतांचा पहिला हप्ता (सेंद्रिय + रासायनिक) द्या.

  • बागेत निचरा करा, बुंध्यात पाणी साचू देऊ नका.

  • कोळेरोगावरील नियंत्रणासाठी पानांच्या बेचक्यात १% बोर्डो मिश्रण फवारावे.

हळद
  • मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने निचऱ्याची व्यवस्था करा.

  • करपा रोगावर प्रोपीकोनॅझोल १० मि. प्रती १० लिटर पाणी फवारावे (१५–२० दिवसांच्या अंतराने).

भाजीपाला (वेलीवर येणारे)
  • मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने पाणी निचरा करा.

  • फळमाशीवर नियंत्रणासाठी प्रत्येक एकरी २ “क्यु लुर” सापळे लावा.

  • पर्णकरपा रोगावर मॅन्कोझेब / झायनेब २.५ ग्रॅ. प्रती लिटर पाण्यात फवारणी करा.

पशुपालन
  • वीजांचा लखलखाट व पाऊस होताना जनावरे झाडाखाली न ठेवता गोठ्यात बांधा.

  • लंपी स्किन डिसीज दिसल्यास पशुवैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच उपचार करा.

    फवारण्या पावसाची उघडीप मिळाल्यावरच घ्याव्यात व द्रावणात ‘स्टिकर’ (गचकटणारा पदार्थ) मिसळल्यास परिणामकारकता वाढते.