खेड : प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी, रायगड, सिंधूदूर्ग या कोकण विभाग झोन नं. 04 मधून मुंबई विदयापीठाच्या आंतरविभागीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी 5 खेळाडूपैकी घरडा महाविदयालयाच्या 2 विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. यामध्ये कुमार सर्वेश सुनील चव्हाण व कुमार पार्थ मनोज शिंदे यांचा सहभाग आहे. पुढील स्पर्धा मुंबई विद्यापीठ कॅम्पस मध्ये होणार असून त्यांना पुढील वाटचालीस क्रिडाशिक्षक प्रा. संजय बोले, क्रिडा कमिटी समन्वयक प्रा. ढवळे, महाविदयालयाचे प्राचार्य डा. प्रमोद पाटील , उपप्राचार्य डा. सचिन पाटील , रजिस्ट्रार प्रा. संदीप मुंन्घाटे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या












