राजापूर (वार्ताहर): पुणे येथिल दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत राजापूर परिसरातील विद्यार्थांसाठी शनिवार २० सप्टेबर २०२५ रोजी सकाळी १० वाजतां राजापूर हायस्कुलच्या कलामंदिर येथे शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम होणार आहे
पूणे येथिल दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून यावेळी दिशा परिवारचे संस्थापक राजाभाऊ चव्हाण व अरूण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थित असणार आहे.
आम्ही फक्त दोन हातातील अतंर कमी करतो- हे ब्रीद वाक्य घेऊन पुणे येथिल दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट गेली १८ वर्ष महाराष्ट्रातील बारावी नंतर पुढे कुठल्या ही शासन मान्य अभ्यासक्रम शिकणाऱ्या गरजू व गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थांसाठी पदवीधर अभियान राबवीत आहे या अभियानाद्वारे दिशा परिवारच्या मदतीने राजापूरातील सन २०१७ पासून आत्तापर्यत ५५ एव्हड्या विद्यार्थांना या अभियानाचा लाभ झाला आहे. या वर्षीही या शिष्यवृत्ती साठी २५ मुले पात्र ठरले आहेत तर या वर्षी राजापूरातील ३० दाते आहेत.
दरवर्षी शिष्यवृती करीतां विद्यार्थांना पुणे येथे जावे लागत होते पण पहिल्यांदाच राजापूर परिसरातील विद्यार्थांसाठी राजापूरच्या कलामंदिर येथे हा कार्यक्रम होत आहे. तरी या कार्यक्रमासाठी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी,पालक,शिक्षणप्रेमी, हितचिंतक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन राजापूर तालूक्याचे समन्वयक गजानन जोशी, अनंत रानडे, बी. के. गोंडाळ यांनी केले आहे.
————————————————————–










