मडूरा नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी नकुळ परब यांची निवड

बांदा : प्रतिनिधी : मडूरा येथील श्रीदेवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी नकुळ अर्जुन परब तर उपाध्यक्षपदी सुशांत सुकाजी मोराजकर यांची एकमताने निवड झाली. संतोष जगन्नाथ परब यांची सचिव पदी फेरनिवड करण्यात आली.

 

श्रीदेवी माऊली मंदिर सभागृहात माजी अध्यक्ष जगन्नाथ परब यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्रोत्सव कमिटीची नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी देवस्थान समिती पदाधिकारी व नवरात्रोत्सव समिती सदस्य उपस्थित होते. सचिव संतोष परब यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. यावेळी नवरात्रोत्सव काळातील सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. उपस्थितांचे आभार संतोष परब यांनी मानले.

——–