वेंगुर्ले : प्रतिनिधी
वायंगणी ग्रामपंचायत या ठिकाणी व दाभोली येथील सातेरी मंदिर या दोन ठिकाणी ग्रामस्थांसाठी कार्यक्रम आयोजित करून सदर कार्यक्रमावेळी “सायबर गुन्ह्याबाबत व अमली पदार्थ विषयी” मार्गदर्शन आणि “समुद्र संदेश, पोलीस संवादातून आधार” या दोन व्हाट्सअप चॅनेल बाबत वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी नागरिकांना माहिती दिली.
यावेळी नागरिकांना सदर दोन्ही चॅनेलला फॉलो करणे बाबत आव्हान करण्यात आले आहे. तसेच “सायबर गुन्ह्याबाबत व अमली पदार्थ विषयी” जनजागृती पर माहिती देण्यात आली.
वांगणीतील कार्यक्रमासाठी सुमारे १२० नागरिक उपस्थित होते. तर दाभोली येथील कार्यक्रमासाठी सुमारे ५० हून अधिक नागरिक उपस्थित होते.












