जिल्ह्यातील पावसाचा पहिला बळी
खेड | प्रतिनिधी : सातारा व रत्नागिरी जिल्ह्यना जोडणाऱ्या रघुवीर घाटातील शिंदे गावानजीक पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या एका २४ वर्षीय तरुण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेने जिल्ह्यातील पावसाचा पहिला बळी ठरला आहे.
ओमकार महेंद्र दहिवलकर राहणार खोपी फाटा असे त्या मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाची नाव आहे. ओमकार हा रविवारी सुट्टी निमित्त पावसाळी पर्यटनासाठी आपल्या मित्रा समवेत रघुवीर घाट येथे गेला होता. शिंदी गाव नजीकच्या एका तलावात त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही. त्याने तलावात उडी घेतली. मात्र तो बराच वेळ झाल्याने परत आला नाही ही बाब पोलिसांना कळवताच पोलीस घटनास्थळी दाखल होत सायंकाळी उशिरा बचाव कार्य सुरू करण्यात आले.
रात्रौ उशिरा त्याचा मृतदेह त्या तलावात आढळून आल्याने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला शवविच्छेदना नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान या तलावात यापूर्वी अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे यामुळे सद्यस्थितीत रघुवीर घाट पर्यटकांना खुणवत असला तरी धोका मात्र कायम आहे.









