आगामी काळात भारताला जगात तिसऱ्या स्थानावर आणण्यासाठी प्रयत्न. – केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे
सिंधुनगरी | बाळ खडपकर : भाजपा सरकारने गेल्या नऊ वर्षात देशातील नागरिकांसाठी 53 प्रकारची कामे केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात दहाव्या क्रमांकावर असलेल्या आपल्या देशाला पाचव्या स्थानावर आणून ठेवले आहे. जागतिक पातळीवर हा देश अग्रेसर राहण्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा अवलंब करून देशाची उत्पादकता वाढविणे व निर्यातक्षम देश बनवून देशाची ताकद आणखी बळकट करण्यासाठी भाजप मजबूत करा. म्हणूनच गट-तट , जात-पात, जुने – नवीन असे वाद नकोत! सर्वांनी एकत्र या व आगामी निवडणुकीत भाजपला आणखी मजबूत करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुनगरी येथील झालेल्या बैठकीत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. निमित्त होतं रविवारच्या भाजपाच्या टिफिन बैठकीच!
आगामी काळ निवडणुकीचा काळ असून, मोदी @9 व लोकसभा मतदारसंघ प्रवास मधील टिफिन बैठकीचे आयोजन रविवारी सिंधुनगरी येथील शरद कृषी भावनांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या बैठकीच्या व्यासपीठावर भाजप नेते प्रमोद जठार, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, प्रसन्ना देसाई, मनोज रावराणे आधी पदाधिकारी व्यासपीठावर होते. सौ नीलम ताई राणे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या टिफिन बैठकीला उपस्थित होते. मार्गदर्शन सत्रा नंतर लागलीच नारायण राणे यांच्या उपस्थितीत टिफिन स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. यातही सर्व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व पत्रकार यांनी सहभाग घेतला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाची उत्सुकता या आगळ्या वेगळ्या टिफिन बैठकीत होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर सावंत यांनी सुंदरपणे केले त्याहीपेक्षा सुंदर टिफिन स्नेहभोजनाचे नियोजन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार अशा सर्वांनीच स्नेहभजनाचा सुखद आनंद घेतला!
भाजप नेते प्रमोद जठार यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी बाबत अर्धवट केलेली चर्चा व याबाबत मार्गदर्शनाची सोपवलेली जबाबदारी स्वीकारत नारायण राणे म्हणाले देशात आणि जगातही भाजप पक्ष मजबूत पक्ष म्हणून नेतृत्व करत आहे. जसा पाऊस कोठेही पडला तरी तो शेवटी समुद्रात जाऊन मिळतो तसा आपला भाजप पक्ष आहे. जे नेते किंवा विधान परिषदेत सदस्य भाजपामध्ये सामील होतात त्यांना सामावून घेण्याचे व सांभाळण्याचे कौशल्य ही भाजपा मध्ये आहे. म्हणून राज्याची राजकीय परिस्थिती काहीही असली तरी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार मजबूत आहे. माझा भाजप मोठा आहे, जगात या पक्षाचे कौतुक होत आहे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी या देशाचे या पक्षाचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. जगात दहाव्या स्थानावरून पाचव्या क्रमांकावर आणलेल्या आपल्या देशाला अमेरिका चायना नंतर तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी एकत्र या, देशासाठी व नागरिकांसाठी भाजप नेतृत्वाने केलेले काम जनतेसमोर ठेवा एकसंघ हाहून निवडणुकीला सामोरे जा. सध्या भाजपाचे 302 खासदार असून आणखी शंभर खासदार निवडून आणायचे असल्याने संघटित ताकद वाढवा असे आवाहन शेवटी नारायण राणे यांनी केले.
भाजप नेते प्रमोद जठार म्हणाले 2022 लोकसभा प्रवास योजनेचे चांगले काम या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात झाले आहे सहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या 1875 बुथमध्ये घर संपर्क जनसंपर्क अभियान सुरू आहे. हा प्रवास कार्यकर्त्यांना संघटित करणारा भाजपची ताकद आणखी मजबूत करणारा आहे. महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत व जे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमात आहे त्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे मार्गदर्शन करतील महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त खासदार भाजपला निवडून आणायचे असल्याने कार्यकर्त्यांनी हा समजून घेण्याचा विषय आहे असे आवाहनही प्रमोद जठार यांनी केले.
भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले यापूर्वी अशा दोन बैठका झाल्या असून ही तिसरी बैठक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. 2015 पूर्वीची देशाची परिस्थिती बदलली असून भाजपाने केलेल्या कामामुळे देश आणि विदेशात या देशाचे स्वागत होत आहे. हा देश आणि या देशातील विकास आणखी मजबूत करण्यासाठी या जिल्ह्यातून भाजपला आणखी मजबूत करूया असे आवाहन त्यांनी केले.
विधानसभा मतदार संघ प्रचार प्रमुख म्हणून आमदार नितेश राणे प्रदेश सचिव निलेश राणे व जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी या जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात या कार्यक्रमा अंतर्गत केलेल्या कामाचे कौतुक व आजच्या टिफिन बैठकीच्या नियोजनाबाबत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक आपल्या भाषणात नारायण राणे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी मानले.