साळशी येथे जागतिक पर्यटन दिनानिमित्त सदानंद गडावर श्रमदान

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत उपक्रम

शिरगाव (प्रतिनिधी)    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या साळशी येथील ग्रामसभेस तब्बल २११ ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सभेत हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निश्चय करण्यात आला.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त साळशी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्यातून ऐतिहासिक सदानंद गडावर श्रमदान करून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. ग्रामस्थांच्या तोंडी घुमणाऱ्या “हर हर महादेव”, “जय भवानी”, “जय शिवाजी” या घोषणांनी गड परिसर दुमदुमून गेला.

या उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्याने गड संवर्धनाला नवे बळ मिळाले.