भाजपा युवा मोर्चाचे आयोजन : नशामुक्तीचा संदेश
सावंतवाडी । प्रतिनिधी : संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा या उपक्रमांतर्गत भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून सावंतवाडीत ‘नमो युवा रन’ या मॅरेथॉनचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. शेकडो धावपटूंनी यात सहभाग घेतला.
या मॅरेथॉनच्या माध्यमातून समाजात नशामुक्तीचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. जिल्ह्यातील युवा शक्तीला विधायक मार्गावर आणण्याचा आणि त्यांना शारीरिक आरोग्यासाठी प्रेरित करण्याचा हा प्रयत्न होता. या ‘नमो युवा रन’ मध्ये मोठ्या संख्येने युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, ज्यामुळे कार्यक्रमाला मोठे यश मिळाले.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या मॅरेथॉनचा शुभारंभ केला. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आयोजक तथा जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखम राजे भोसले, राजू राऊळ, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदिप मेस्त्री, वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष राजन गिरप यांची विशेष उपस्थिती होती.
याशिवाय, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सिद्धेश चिंचळकर, जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा संतोष पुजारे, कुडाळ युवा मोर्चा मंडल अध्यक्ष तन्मय वालावालकर, कणकवली मंडल अध्यक्ष सर्वेश दळवी, कणकवली युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागर राणे, जिल्हा बँक संचालक रवींद्र माडगावकर, आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, सावंतवाडी युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, आंबोली युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पास्स्ते, बांदा युवा मोर्चा अध्यक्ष सिध्देश कांबळी, वेंगुर्ला मंडल अध्यक्ष प्रणव वायंगणकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक संदिप गावडे यांचे उपस्थित मान्यवरांनी आणि जिल्हा भाजपने विशेष अभिनंदन केले. युवा मोर्चाच्या या उपक्रमाने ‘सेवा पंधरवडा’ अधिक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी बनल्याची भावना व्यक्त करण्यात आली.












