देवगड कोस्टल हाफ मॅरेथॉन : पर्यटनाला चालना देण्यासाठी उपक्रम

देवगड (प्रतिनिधी) : देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी, देवगड आणि डॉक्टर फॅटर्निटी क्लब, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने “दौड आरोग्याची, साद देवगडच्या पर्यटनाची” या घोषवाक्यासह “देवगड कोस्टल हाफ मॅरेथॉन रन” या स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे.

ही माहिती रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीचे अध्यक्ष गौरव पारकर यांनी देवगड डायमंड हॉटेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी खजिनदार दयानंद पाटील, सचिव अनुश्री पारकर, रो. विजय बांदिवडेकर व रो. रुपेश खोत उपस्थित होते.

स्पर्धेत 21, 11 आणि 5 किलोमीटर अशा तीन गटांचा समावेश आहे.

21 कि.मी. टाईम रन : पुरुष व महिला गटामध्ये आयोजित होणार असून प्रथम क्रमांक विजेत्याला 10,000 रुपये, द्वितीय 7,000 रुपये, तर तृतीय क्रमांक विजेत्याला 5,000 रुपये, मेडल व ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

11 कि.मी. टाईम रन : पुरुष व महिला गटातील प्रथम क्रमांकासाठी 5,000 रुपये, द्वितीय 3,000 रुपये, तर तृतीय 1,500 रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे.

5 कि.मी. फन रन : सहभागी स्पर्धकांना मेडल व ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

सर्व स्पर्धकांना आकर्षक टी-शर्ट देण्यात येणार आहेत. 21 कि.मी. रन डायमंड हॉटेल – कातवण – डायमंड हॉटेल, 11 कि.मी. रन डायमंड हॉटेल – मीठमुंबई बीच – डायमंड हॉटेल, तर 5 कि.मी. फन रन डायमंड हॉटेल – तारामुंबरी पूल – डायमंड हॉटेल असा मार्ग असणार आहे.

सहभाग नोंदणीसाठी स्पर्धकांनी

https://alpharacingsolution.com/e/devgad-coastal-run-2025

या लिंकवर 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत नोंदणी करावी. प्रवेश फी : 21 कि.मी. – ₹1200, 11 कि.मी. – ₹800, 5 कि.मी. – ₹400 आहे. विशेष म्हणजे, 10 ऑक्टोबरपूर्वी नोंदणी करणाऱ्यांना प्रवेश फीवर 10 टक्के सवलत दिली जाणार आहे.
18 ते 44 व 45 ते 54 व 55 ते 64 व 65 च्या पुढील अशा चार वयोगटातील प्रत्येकी वयोगटातील दोन विनर स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे