विजयदुर्ग येथील दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन

विजयदुर्ग ( प्रतिनिधी) : विजयदुर्ग राममंदिर येथील श्री दुर्गामाता कला-क्रिडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने यंदा नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दि. २ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता लहान मुलांसाठी भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम विजेत्याला २००० रुपये रोख द्वितीय विजेता १५०० रुपये, तृतीय विजेता १००० रुपये आणि तीन उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी ५०० रुपयाची बक्षीस देण्यात येणार आहेत. तरी या स्पर्धेमध्ये विजयदुर्ग पंचक्रोशीतील जास्तीत जास्त मुलांनी भाग घ्यावा असा आवाहन मंडळाचे अध्यक्ष आनंद देवरुखकर यांनी केले आहे.

दरम्यान, या नवरात्रोत्सवामध्ये रोज पूजा-अर्चा, आरती, रात्री गरबा दांडिया नृत्य याचबरोबर महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. या नवरात्रोत्सवाची सांगता शनिवारी सायंकाळी ४ वाजता देवीच्या विसर्जन मिरवणुकीने होईल.