देवगड
देवगड हुन वैभववाडी कडे जाणाऱ्या एसटी बसला (MH-13 C V 7903)देवगडच्या दिशेने येणाऱ्या साई गणराज ट्रॅव्हल्स (MH-46 BY 3131)वरील चालकाने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने व हयगयीने भरधाव वेगाने गाडी चालवून एसटी बस चे उजव्या साईड कडील साईड आरशाला जोराची धडक देऊन एसटी समोरील काच,चे नुकसान केले व एसटी बस,व स्वतःच्या साई गणराज ट्रॅव्हल्सचे नुकसान केले अशी फिर्याद एसटी चालक प्रवीण राजाराम घाटे यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे.सदरची घटना ३० सप्टेंबर रोजी स.८.३० च्या सुमारास टेंबवली तिठा येथे घडली.या घटनेतील संशयित ट्रॅव्हल्स चालक धिरेन अविनाश राणे रा हडपीड याचे विरुद्ध बीएनएस २८१,३२४(२)मोटर वाहन अधिनियम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव करीत आहेत.









