तांडावस्ती सुधार योजेनेंतर्गत राजापूर विधानसभा मतदार संघातील १९ कामांना दोन कोटी पन्नास लाखाचा निधी मंजूर
राजापूर (प्रतिनिधी): शासनाच्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंर्गत राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघातील विविध तांडा वस्त्यांच्या सुधारणासाठी महायुती सरकारकडून तब्बल दोन कोटी पन्न्नास लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री ना. अतुल सावे यांनी हा निधी मंजूर केला आहे. भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे यांनी केलेला विशेष पाठपुरावा आणि प्रयत्नांने हा निधी मंजूर झाला आहे.
शासनाकडून तांडावस्तीतील विविध विकास कामांसाठी मतदार संघात एवढया मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध झाल्याने या भागाच्या विकासाला गती मिळणार आहे. तशी माहिती सौ. मराठे यांनी दिली आहे.
राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघातील विविध तांडा वस्त्यांच्या विकास कामांसाठी आपण स्वता विविध कामे सुचविली होती. याबाबतचा प्रस्ताव राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री ना. अतुल सावे यांच्याकडे दिली होता. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्याला अखेर यश आले असून राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघातील विविध तांडा वस्त्यांतील विकास कामांना निधी मंजूर झाला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, पालकमंत्री ना. उदय सामंत, आमदार किरण सामंत यांनी यासाठी विशेष सहकार्य केल्याचे सौ. मराठे यांनी सांगितले.
राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघातील तांड वस्ती सुधारणा योजनेतुन एकूण १९ कामांना दोन कोटी पन्नास लाखाचा निधी मंजूर झाला असून यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी हद्दीतील तांबळवाडी रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, किरबेट भावडे ग्रामपंचायत अंतर्गत तुकाराम वाजे यांच्या घराकडे जाणारा रस्ता तयार करणे १५ लाख, राजापूर तालुक्यातील दोनिवडे गवळवाडी ते राष्ट्रीय महामार्ग रस्ता सुधारणा करणे ५ लाख, कोतापूर तेरवण तिठा धनगरवाडी पांडुरंग शेळके घर ते कळंबा माता मंदिरापर्यंत रस्ता सुधारणा करणे १५ लाख, कोतापूर कलमकाटे धनगरवाडी बोडेकर घर ते तुकाराम जांगली घरापर्यंत गटार लाईन करणे व पाईप मोरी बांधणे १५ लाख, कोतापूर देवीहसोळ मुख्य रस्ता गोंडयाची निवई धनगरवाडी रस्ता सुधारण करण्डो १५ लाख, पेंडखळे धनगरवाडी स्मशानभूमी ते रामचंद्र गोरे घर रस्ता दुरूस्ती व डांबरीकरण करणे १५ लाख, ओझर मुख्य रस्ता ते धनगरवाडी रस्ता सुधारणा करणे २५ लाख, दसूर भंडकंबा ते धनगरवाडी रस्ता सुधारणा करणे २५ लाख, आजिवली मुख्य रस्ता ते मानेवाडी धनगरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १५ लाख, ताम्हाणे पहिलीवाडी धनगरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ५ लाख, संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे ते गवळीवाडी रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, मुर्शी दखिण धनगरवाडी रस्त्याला गटार बांधणे १० लाख, लांजा तालुक्यातील गवाणे कर्नवले धनगरवाडी शाळा ते रामचंद्र घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ५ लाख, गवाणे गवळीवाडी स्मशानभूमी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १९ लाख, लांजा विवली धनगरवाडीकडे जाणारा रस्ता तयार करणे व डांबरीकरण करणे १५ लाख, आसगे तळेराई ते गवळीवाडी पर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १५ लाख, गोविळ गोपाळवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १५ लाख या कामांचा समावेश आहे.
राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघातील या कामांना मंजूरी देत निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सौ. मराठे यांनी ना. सावे यांसह भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, पालकमंत्री ना. उदय सामंत तसेच आमदार किरण सामंत यांचे आभार मानले आहेत. या विकास कामांमुळे खऱ्या अर्थाने तांडा वस्त्यांच्या विकासाला गती मिळणार असल्याचे सौ. मराठे यांनी सांगितले










