रत्नागिरी: कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्राने रत्नागिरीकरांसाठी एक खास संधी आणली आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून १० दिवसांचा निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हे योग शिबिर ६ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अरिहंत मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात होईल. योग वर्ग दररोज सायंकाळी ५.३० वाजता होणार असल्यामुळे नोकरदार वर्ग आणि महिलांसाठी हे विशेष फायद्याचे ठरू शकते.
अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागींना प्रमाणपत्र देखील दिले जाईल. जास्तीत जास्त स्थानिक लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी योग प्रशिक्षक प्रा. अक्षय माळी यांच्याशी ७७९८४९०६१५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच, इच्छुक https://forms.gle/6S6zrJ8jcUE5tU5C8 या लिंकवर जाऊन नोंदणी करू शकतात.













