पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आडवली मालडी विभागात 1 कोटी 33 लाख विकासनिधी मंजूर

भाजपा जिल्हा चिटणीस महेंद्र चव्हाण, कार्यकारणी सदस्य राजू परुळेकर यांनी व्यक्त केले आभार

मालवण | प्रतिनिधी : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आडवली मालडी विभागामध्ये पहिल्या टप्यात 1 कोटी 33 लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर झाला आहे. आमचे नेते खासदार नारायण राणे साहेब व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या शिफारस नुसार हा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे साहेब, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे हा निधी मंजुर व्हावा यासाठी प्रयत्न करणारे भाजपा जिल्हा चिटणीस महेंद्र चव्हाण, कार्यकारणी सदस्य राजू परुळेकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.

जनसुविधा योजनेतून गोठणे बांदकीवाडी सडेवाडी रस्त्या डांबरीकरण करणे (5 लाख), असरोंडी मळीवाडी प्रभाकर रामचंद्र महाजन घर ते धनाजी मुरारी सावंत यांच्या घरापर्यंत पायवाट बांधणे (3 लाख), गोठणे यशंवतवाडी स्मशानभूमी बांधणे (4 लाख), असगणी मुख्यरस्ता ते कुस्थळवाडी रस्त्या डांबरिकरण करणे (5 लाख), निरोम मुख्य रस्ता ते पादऱ्याचे झाड ते टेंबवाडी रस्या डांबरीकरण करणे (6 लाख), निरोम मुख्य रस्ता ते चाळेश्वर मंदिर डांबरीकरण करणे (20 लाख), निरोम कोणी धरण रस्ता डांबरीकरण करणे (15 लाख)

ग्रामीण मार्ग- राठीवडे गुंजाचीवाडी ग्रामा 149 डांबरीकरण करणे (5 लाख), ओवळीये लोहारवाडी ग्रामा 159 रस्त्या डांबरीकरण करणे (5 लाख)

क वर्ग पर्यटन – बुधवळे श्री मिर्लेश्वर भगवती मंदीर सुशोभिकरण करणे (10 लाख), अंगणवाडी- असंगणी तांबेवाडी अंगणवाडी दुरुस्त करणे (1 लाख), राठीवडे बोद्धवाडी अंगणवाडी दुरुस्त करणे (1 लाख), मठबुद्रक अंगणवाडी दुरुस्त करणे (1 लाख), हिवाळे मधलीवाडी अंगणवाडी दुरुस्त करणे (3 लाख), गोठणे गावढण अंगणवाडी दुरुस्त करणे (2 लाख)

इतर जिल्हा मार्ग- इजिमा -32 असरोंडी मळी साड ओसरगांव डांबरीकरण करणे (10 लाख), शाळा दुरूस्ती- हिवाळे परबवाडी शाळा दुरुस्ती करणे (3 लाख), बंधारा-किर्लोस गावठण वाडी बंधारा बांधणे (15 लाख), स्ट्रीट लाईट- किर्लोस भटवाडी स्ट्रीट लाईट करणे (3 लाख), गोठणे बांदकीवाडी स्ट्रीटलाईट करणे – (2 लाख), साकव- मठबुद्रक पाणलोस बाळा घाडीगांवकर रख्यावरील ओढ्यावर पुल बांधणे (20 लाख) ही विकास कामे मंजूर झाली आहेत. अशी माहिती देण्यात आली.