सावंतवाडी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण जाहिर 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज आरक्षण सोडत जाहिर करण्यात आली. नगरपरिषदेच्या सभागृहात प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद यापूर्वीच सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाले आहे.

 

*प्रभाग निहाय आरक्षण* :

प्रभाग क्रमांक ‘अ’ गट (जागा) ‘ब’ गट (जागा)

प्रभाग १ अ – ना.म.प्र. (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ), ब – सर्वसाधारण खुला,

प्रभाग २ अ – ना.म.प्र. महिला, ब – सर्वसाधारण खुला,

प्रभाग ३ अ – सर्वसाधारण महिला, ब – सर्वसाधारण खुला,

प्रभाग ४ अ – सर्वसाधारण महिला, ब – ना.म.प्र. सर्वसाधारण,

प्रभाग ५ अ – सर्वसाधारण महिला, ब – सर्वसाधारण खुला,

प्रभाग ६ अ – सर्वसाधारण महिला, ब – सर्वसाधारण खुला,

प्रभाग ७ अ – सर्वसाधारण महिला, ब – सर्वसाधारण खुला,

प्रभाग ८ अ – सर्वसाधारण महिला, ब – ना.म.प्र. सर्वसाधारण,

प्रभाग ९ अ – ना.म.प्र. महिला, ब – सर्वसाधारण खुला तर

प्रभाग १० अ सर्वसाधारण महिला तर ब अनुसूचित जाती साठी आरक्षित झाला आहे.

या आरक्षणामुळे काही दिग्गजांना आपले प्रभाग बदलावे लागणार आहेत, तर काही ठिकाणी नवीन इच्छुकांना संधी मिळणार आहे. अनेक प्रभागात महिलांसाठी आरक्षित झालेल्या जागांमुळे राजकीय पक्षांना सक्षम महिला उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे.

*राजकीय हालचालींना वेग*

प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर होताच सावंतवाडीतील राजकीय गोटात त्वरित हालचाली सुरु झाल्या आहेत. आरक्षणाची यादी नगरपरिषदेच्या सूचना फलकावर लावण्यात आली असून, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी सोडतीच्या तपशिलांचे बारकाईने विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे. ज्या प्रभागांमध्ये आरक्षण बदलले आहे, तेथील इच्छुकांनी पर्यायी प्रभागांची चाचपणी सुरु केली आहे.