वेंगुर्ले l प्रतिनिधी :बंदर व मत्स्य विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांच्या मार्फत उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी मच्छीमार समाजासाठी मोफत वैद्यकीय तपासणी व आरोग्य शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित केले आहे.
या शिबिरात मधुमेह, रक्तदाब तपासणी, कर्करोग तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी, नेत्र तपासणी, क्षयरोग तपासणी , बालरोग , स्त्रीरोग तपासणी, तसेच इतर सर्व तपासणी व उपचार मोफत केले जाणार असून, मच्छीमार बांधवांचे आभा, आयुष्यमान व वय वंदना कार्ड काढण्यात येणार आहे.
तरी जास्तीत जास्त मच्छीमार समाज बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व आपल्या आरोग्यविषयक बाबींची तपासणी करून घ्यावी असे आवाहन वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संदीप सावंत यांनी केले आहे.










