मोंड विकास सोसायटी, मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी करीता दहा हजाराची मदत

मोंड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, मर्यादित मोंड, ता. देवगड या संस्थेचे अध्यक्ष श्री. गोविंद उर्फ बाबा झरकर, उपाध्यक्ष श्री. मधुकर नाटेकर तसेच संचालक मंडळातील सदस्य श्री. गणेश राणे, श्री. प्रसाद कुळकर्णी, श्री. अनाजी घाडी, श्री. नारायण उर्फ बाळा अनभवणे, श्री. भगवान मोंडे, श्री. भिकाजी तांबे, श्री. चंद्रकांत मोंडे आणि सौ. सरिता चव्हाण यांनी संस्थेच्या नफ्यातील काही भाग मुख्यमंत्री सहाय्यता निधी करीता द्यावा अशी सूचना संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडली. त्यास सर्व सभासदांनी एकमुखाने पाठींबा दिला.

 

त्यानुसार दि. ०६/१०/२०२५ रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री बाबा झरकर सचिव श्री. प्रभाकर बिर्जे आणि संचालक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री. प्रकाश बोडस यांनी सदर रकमेचा धनादेश देवगड तहसीलदार श्री. रमेश पवार यांचेकडे सुपुर्द केला.

 

अध्यक्ष, मोंड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, मर्यादित.