बांदा l प्रतिनिधी :बांदा येथे सावंतवाडी तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कुल मडुरा प्रशालेला विविध स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त झाले. १७ वर्षे मुलगे गटात मंगेश नितीन नाईक याने गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याची जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत निवड झाली आहे.
तसेच १७ वर्षे मुली गटात क्लेरीचा जुलियस रोड्रिक्स हीने गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.तिचीही जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. उर्वशी विजय शेर्लेकर हीने थाळी फेक व भाला फेक स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. १४ वर्षे गटात तपस्या भरत धुरी, अलिषा रघोबा गावडे, देवेश गोपाळ नाईक यांनीही चांगली कामगिरी केली. विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक महेश नाईक व लहू बांदेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे अध्यक्ष, कार्याध्यक्ष व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. सायली परब, शालेय समिती सदस्य, पालक शिक्षक संघ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.












