मसुरे | झुंजार पेडणेकर :देवगड तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री भगवती हायस्कूल मुणगे च्या विध्यार्थ्यानी उज्वल यश प्राप्त केले.
लांब उडी व 200 मिटर धावणे प्रथम क्रमांक लिशा दयानंद तेली, उंच उडी प्रथम क्रमांक प्रांजल ऋषीकेश कामतेकर, हर्डल्स 100मी प्रकारात मृगाक्षी मंगेश हिर्लेकर प्रथम क्रमांक अशा प्रकारे मुलींमधून 17वर्षाखालील गटात यश संपादन केले. १४ वर्षांखालील मुलगे गटातून
जनार्दन लक्ष्मण पटकारे ८० मीटर हर्डल्स तृतीय क्रमांक,
१७ वर्षांखालील मुलगे गटातून आयुष सोनू सावंत ११० मीटर हर्डल्स तृतीय क्रमांक व ४०० मीटर धावणे प्रथम क्रमांक पटकवला. त्याचबरोबर पार्थ मंगेश मुणगेकर ४ किलोमीटर चालणे प्रथम क्रमांक
तर ओम सदानंद मुणगेकर. व पार्थ मंगेश मुणगेकर यांनी अनुक्रमे ५ किलोमीटर चालणेप्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक पटकावले. तसेच
रियान चंद्रकांत मुणगेकर याने थाळीफेक प्रथम क्रमांक पटकवला. विध्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रशालेचे सहाय्यक शिक्षक हरिदास महाले व प्रसाद बागवे यांचे मार्गदर्शन लाभले तर सहाय्यक शिक्षिका रश्मी कुमठेकर यांचे सहकार्य लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे पदाधिकारी व मुख्याध्यापिका मोनिका कुंज तसेच शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.












