उंबर्डे येथील महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न

पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

वैभववाडी प्रतिनिधी :
उंबर्डे येथील महालक्ष्मी मंदिराच्या जिर्णोध्दार सोहळ्याला पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देत दर्शन घेतले. गावचे ग्रामदैवत असलेले महालक्ष्मी मंदिर उभारण्यात आले आहे. उंबर्डे ते भुईबावडा मार्गावर आकर्षक मंदिर उभे राहिले आहे. नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा गेली पाच दिवस सुरू आहे. या सोहळ्यासाठी गावातील मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत.

सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. समितीच्या वतीने अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे यांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. व देवीचे दर्शन घेतले.
यावेळी नितेश राणे म्हणाले, गावच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही. मंदिर परिसर सुशोभित करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. या सोहळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, हुसेन लांजेकर, राजेंद्र राणे, बंड्या मांजरेकर, अतुल सरवटे, रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, सुनील रावराणे, उंबर्डे पोलीस पाटील विजय दळवी, शामराव दळवी, शैलेंद्र दळवी, सदानंद दळवी, रत्नाकर बंदरकर, उंबर्डे सरपंच वैभवी दळवी, रज्जब रमदुल, पदाधिकारी व देवस्थान समिती पदाधिकारी, ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.