देवगड वर महिला राज

देवगड l प्रतिनिधी :देवगड तहसिल कार्यालयात पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत प्रक्रिया सोमवारी पार पडली.पं.स.च्या १४ गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले यामध्ये इच्छुकांचा पुरता भ्रमनिरास झाला असून विशेष म्हणजे शिरगाव पंचायत समिती गणात व जि.प.गटात महिला आरक्षण पडल्याने येथून इच्छुक असलेल्या पुरूष उमेदवारांचा पुरता हिरमोड झाला आहे.

 

देवगड पंचायत समितीच्या १४ गणांची आरक्षण सोडत प्रक्रिया निवडणुक उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसलिदार आर.जे.पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी नायब तहसिलदार श्रीकृष्ण ठाकूर उपस्थित होते.

 

आरक्षण सोडत प्रक्रियेची रूपरेषा उपजिल्हाधिकारी शेवाळे यांनी सांगीतली यानंतर देवगड पंचायत समिती कार्यक्षेत्रातील लोकसंख्येनुसार आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याचे तहसिलदार पवार यांनी सांगीतले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, भाजपा तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रqवद्र जोगल, जयेश नर, अमित साटम, योगेश चांदोस्कर, दयानंद पाटील, पंकज दुखंडे, दिलीप कदम आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

 

आरक्षण सोडत प्रक्रियेच्या सुरूवातीला पंचायत समितीच्या १४ गणांपैकी अनुसुचित जातीसाठी १, नामाप्रसाठी ३ व सर्वसाधारणसाठी १० गण आरक्षित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.त्यानुसार आरक्षण सोडत चिठ्ठीद्वारे काढण्यात आली.देवगड हायस्कूलचे विद्यार्थी रिषभ कोयंडे आणि काव्या फरांदे या विद्याथ्र्यांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली.सुरूवातीला अनुसुचित जाती महिला या प्रवर्गासाठी तळवडे पंचायत समिती गण आरक्षित झाल्याचे जाहीर करण्यात आले.यानंतर नामाप्रसाठी चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली यामध्ये कोटकामते व पुरळ हे दोन गण नामाप्र महिला प्रवर्गासाठी तर पोंभूले हा गण नामाप्र प्रवर्गासाठी आरक्षित झाला.उर्वरीत १० प्रभागातील चार प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित करण्यात आले यामध्ये बापर्डे, फणसगाव, शिरगाव व qकजवडे हे गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले तर तिर्लोट, पडेल, नाडण, मणचे, मुणगे आणि कुणकेश्वर हे सहा प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचे तहसिलदार आर.जे.पवार यांनी यावेळी जाहीर केले.

 

 

 

देवगड पंचायत समिती गणांचे आरक्षण असे

 

१ पुरळ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

 

२ तिर्लोट – सर्वसाधारण प्रवर्ग

 

३ पडेल- सर्वसाधारण

 

४ नाडण- सर्वसाधारण

 

५ बापर्डे- सर्वसाधारण महिला

 

६ मणचे- सर्वसाधारण

 

७ पोंभुर्ले – नागरिकांचा मागास प्रवर्ग

 

८ फणसगाव- सर्वसाधारण महिला

 

९ शिरगाव- सर्वसाधारण महिला

 

१० तळवडे- अनुसुचित जाती महिला प्रवर्ग

 

११ qकजवडे- सर्वसाधारण महिला

 

१२ कोटकामते- नामाप्र महिला प्रवर्ग

 

१३ मुणगे- सर्वसाधारण

 

१४ कुणकेश्वर – सर्वसाधारण

 

 

 

जि.प.गटाचे आरक्षण असे

 

१ पुरळ- सर्वसाधारण

 

२ पडेल- सर्वसाधारण महिला

 

३ बापर्डे- सर्वसाधारण महिला

 

४ शिरगाव- अनु.जाती(सर्वसाधारण)

 

५ qकजवडे- सर्वसाधारण महिला

 

६ कुणकेश्वर- नागरिकांचा मागास प्रवर्ग