विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी युवकास अटक

कणकवली : विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी संकेत शांताराम चौगुले (२५, रा. फोंडाघाट – बाबीचे भाटले) याला कणकवली पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. ही घटना ९ ऑक्टोबरला घडली होती. विवाहिता आपल्या मुलांना शाळेत सोडून घरी येत होती. त्यावेळी संशयित संकेत याने तिचा विनयभंग केला, अशी फिर्याद विवाहितेने पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार संशयितास अटक करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे करीत आहेत.