मसुरे | झुंजार पेडणेकर
प्रा शाळा गुरामवाडी येथे बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीने
भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी शिक्षीका संपदा भाट यांनी सर्वांचे स्वागत केले. वाचाल तर वाचाल याचा अर्थ मुलाना समजावून सांगितला.
सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर यांनी मुलाना मार्गदर्शन केले. आज रोज पुस्तके वाचणे काळाची गरज झाली आहे. मुलाना वाचनाची गोडी लागली पाहिजे पुस्तके मुलाना देणे ही मोठ्यांची जबाबदारी आहे. चांगल्या पुस्तकातील उतारे मोठ्याने वाचून दाखवले पाहिजेत.
केवळ गोष्टीची पुस्तके न वाचता विविध विषयावरील सोपी पुस्तके वाचायला द्यायला हवी. सेवांगण गेली ५० वर्ष वाचन संस्कृती वाढीसाठी प्रयत्न करत आहे कट्टा येथील वाचनालयाचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
मुख्याध्यापिका अमिता भाबल मॅडम यानीही मुलाना मार्गदर्शन केले. माझ्या आयुष्यातील आजचा वाचन प्रेरणा दिन खूपच छान झाला याबद्दल सेवांगणचे आभार मानले
दीपक भोगटे यानी मुलाना वाचनासाठी प्रवृत्त करण्यासाठी वाचनालयाचे विविध उपक्रम आहेत त्याची माहिती दिली
आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने
गौरी पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त सर्व मुलाना भेटवस्तू व खावू देण्यात आला याबद्दल रश्मी पाटील यांचे आभार मानले.
सार्थक गुराम, कार्तिक वडर, दुर्वा झोरे, प्रणित कुडाळकर, प्रतिक गोठणकर, सिध्देश गोठणकर, प्राची खोत, देवांशी गोठणकर, मंथन घाडीगावकर, हर्ष चव्हाण या मुलानी विविध विषयावरील पुस्तकांच्या उताऱ्याचे वाचन केले. अब्दुल कलाम, ग. दि. माडगुळकर, हवामान, पर्यावरण, मालवणी कविता
आदी विषयावर सुंदर वाचन केले.
सर्व विद्यार्थ्याना साधनाचा दिवाळी अंक,
राष्ट्रीय नेत्यांची पुस्तके, भेटवस्तू व खावू
देण्यात आला
या कार्यक्रमास सेवांगणचे किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, काळसेकर सर, दीपक भोगटे, श्रीधर गोंधळी, मिनार म्हाडगुत, ग्रंथपाल मंगल पराडकर,
अंगणवाडी सेविका जांभवडेकर मॅडम,
मुख्याध्यापिक भाबल मॅडम, स्वाती राठोड मॅडम, संपदा भाट मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भिवा गोठणकर, उपाध्यक्षा सुपाली वडर ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.












