एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनीअरींग कणकवली येथे सन २०२५-२६ करीताचा नवांगतांचा सत्कार सोहळा व पालक मेळावा दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
या सोहळयाकरीता प्रमुख पाहुणे म्हणुन श्री. रविंद्र पांचाळ, पोलिस सब इन्पेक्टर, कणकवली पोलिस स्टेशन , श्री. अशोक लक्ष्मण येजरे , माजी प्राचार्य नाथपै कॉलेज, कुडाळ, श्री. चैतन्या महोदव सुकी, शिक्षक, गुलाबताई दिनानाथ नाईक कॉलेज, वेतोरे, वेंगुर्ला , श्री. विजय रामचंद्र मेस्त्री शिक्षक, कै. सौ. एस. आर. पाटील, ज्युनिअर कॉलेज पाट, कुडाळ, हे उपस्थित होते. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी सर्व पालक व विद्यार्थी यांना संबोधीत करताना महाविद्यालय विद्यार्थ्यांना देत असलेल्या सर्व सेवा सुवीधा , विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी असणारे प्लानिंग, विद्यार्थ्यांना दिले जाणारे ट्रेनिंग, विद्यार्थ्यांसाठी घेतले जाणारे अतिरीक्त क्लासेस, नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतले जाणारे रेमेडीयल क्लसासेस, वर्गांप्रमाणे केलेले पालकांचे ग्रुप त्यावर दिले जाणारे दैनंदीन अपडेट या बाबींचा उल्लेख केला.
या कार्यक्रमात मागील वर्षी मुंबई विद्यापीठाच्या प्रथमवर्षाच्या परीक्षेत मुंबई विद्यापीठात प्रथम आलेल्या १२ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच १०० टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी आलेल्या पालक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या सोयी – सुविधा व शिक्षणाचा दर्जा याबाबत समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विवीध कलागुण दर्शनाचा कार्यक्रम साजरा केला.
या कार्यक्रमाकरीता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर व प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. ओंकार साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष विभागाच्या सर्व स्टाफने सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता काम पाहीले. सदरच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. भार्गवी कवटकर, कु. प्रसाद गवाणकर यांनी पाहीले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. निलमताई राणे, उपाध्यक्ष मा. श्री. निलेशजी राणे, सचिव मा. श्री. नितेशजी राणे यांनी उपस्थित पालक व विद्यार्थी यांचे विशेष कौतुक केले.










