खेड : येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष एम. एस्सी. ऑरगॅनिक केमिस्ट्री चा निकाल नुकताच जाहीर झाला. मुंबई विद्यापीठांतर्गत सेमिस्टर 4 च्या 2024-25 मधील परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये पार्थ अनिरुद्ध गोखले याने 8.18 (ए) ग्रेड (75.86%) सह प्रथम क्रमांक पटकावला. तसेच साहिल प्रकाश कदम याने 8.11 (ए) ग्रेड (73.90%) सह द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर कु. अर्चना बाळकृष्ण झोरे हिने 8.6 (ए) ग्रेड 73.00% सह तृतीय क्रमांक पटकावला. विभागाचा एकूण निकाल हा 70.58% लागला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा.डॉ. घुंबरे, प्रा.सागर, प्रा.तेजल बडबे, तसेच केमिस्ट्री विभागातील इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन, ॲड. आनंदराव भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी, विभाग प्रमुख डॉ. एस. के. घुमरे तसेच केमिस्ट्री विभागातील सर्व प्राध्यापक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.












