समृ्द्धी महामार्ग साडेचार वर्षात होऊ शकतो तर सतरा वर्षे झाले कोकणातला रस्ता का पूर्ण होत नाही?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

खेड | प्रतिनिधी  : 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजपासून कोकण दौरा सुरु केला आहे. खेड येथे बोलतांना राज ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली.खेडमध्ये बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात जे सुरु आहे ते वाईट आहे.तेच ते घडत असेल तर मतदानाला काही अर्थ उरला आहे का? असा प्रश्न पडतोय. जे सुरु आहे त्यात आनंद मिळत असेल तर मग भोगा, असा संताप राज यांनी व्यक्त केला.पुढे म्हणाले की, तुमची मला साथ हवी आहे. समृ्द्धी महामार्ग साडेचार वर्षात होऊ शकतो तर सतरा वर्षे झाले कोकणातला रस्ता का पूर्ण होत नाही? खरं तर हा दौरा तुमच्या मनगटात ताकद देण्यासाठी आहे. आगामी नगर परिषद निवडणुका आपण स्वबळावर लढवणार आहोत. कुणाच्या युत्या नको अन् भानगडी नकोत. असं म्हणून राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला आहे.