खेड | प्रतिनिधी : आगामी जाहिर होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याच्या स्पष्ट सुचना मनसे अद्यक्ष राज ठाकरे यांनी खेड येथील कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या.
खेड शहरातील वैश्य भवन येथे कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश गुरुवारी आयोजित करण्यात आला होता त्यावेळी राज ठाकरे बोलत होते ते पुढे म्हणाले की, संपूर्ण दौरा हा नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका पक्ष बांधणी याच्यासाठी हा दौरा आहे काही भाषण बाजीचा नाही गेल्या ५ ते ६ वर्षात तुम्ही किती भाषणे ऐकली आहेत आणि त्या भाषणाचे परिमाण ही तुम्ही भोगत आहात मी त्या दिवशी माझी प्रतिक्रिया देताना सांगितले की जो चुकीचा कॅरम फुटतो ना आणि कुठच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही. कोण कुठे आहे सध्या तेच कळत नाही.
मला माझ्या सहकाऱ्या चा अभिमान वाटतो बाहेर जाता जेव्हा ओळख सांगता की महाराष्ट्र नवं निर्माण सेनेची माणसे आहेत याचा सार्थ अभिमान आहे.सद्या महाराष्ट्रातील आमदार खासदार पाहिले तर प्रश्न पडतो आणि विचारावेसे वाटते सद्या कुठे आहे.सद्या कोणा बरोबर आहात याचा समाचार येत्या काही दिवसांत घेणार आहे.
माझ्या मनात मला त्रास झालाय प्रत्येक व्यक्तीला जो त्रास झालाय तो कुठेतरी व्यक्त होणे गरजेचे आहे आवश्यक आहे पक्ष म्हणून एक सही संतापाची मोहीम राबवली नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद त्याला मिळाला लोकांनी येऊन येऊन त्याच्यावर सह्या केल्या मला आता बघायचे आहे की येणाऱ्या निवडणूकित महाराष्ट्रातील जनता त्यांचा राग व्यक्त करते का की पुन्हा यांच्या सगळ्या पैशाच्या तमाशा वरती विकले जात आहेत का? कारण त्याच त्याच गोष्टी जर अशा होणार असतील आणि तुम्ही नुसते मतदान करत बसणार असाल तर राजकारण आणि निवडणुका ना काहीच अर्थ उरणार नाही कशा साठी भाषणे द्यायची अन कशासाठी निवडणूका लढवायच्या असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. यातून जर नागरिकांना आनंद मिळत असेल तर भोगा मग असा सल्ला देखील दिला.
माझी अपेक्षा आहे मला तुमची साथ हवी आहे पण मागच्या वेळी ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या आता नगर परिषदेच्या निवडणुकांच्या लढवायच्या आहेत या आपल्याला स्वबळावरती लढवायची आहेत कोणालाही बरोबर न घेता कोणाशी युती नको कोणत्या भानगडीच नकोत.
आणि मला खात्री आहे की आपण महाराष्ट्र नवं निर्माण सेना खेड मध्ये स्वबळावर निवडणूका लढवेल निश्चितच आपल्याला यश मिळेल असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मतदान करताना अनेक आमदार खासदार निवडून देतात फक्त तुमच्या मनाशी एक प्रश्न विचारा की आमच्या कोकणातला रस्ता १७ वर्ष का होत नाही अजून पूर्ण होत नाहीये याचा जाब मात्र त्यांना विचारा असा सल्ला ही ठाकरे यांनी यावेळी दिला.