चौके बाजारपेठेने घेतला मोकळा श्वास

चौके ग्रामपंचायात,व्यापारी संघ,चिरेखान व्यवसायिक यांचा बाजारपेठ स्वच्छतेसाठी पुढाकार

चौके – प्रतिनिधी :- चौके बाजारपेठेत गेली अनेक वर्ष स्वच्छतेचा प्रश्न भेडसावत होता बाजारपेठेत ठीक ठिकाणी कचऱ्याची समस्या होत होती. त्याचप्रमाणे बाजारपेठेतील तिन्ही मार्गावरील साईटपट्टी खचल्याने वाहन चालक पादचारी तसेच आठवड्या बाजारादिवशी बाहेरील व्यापाऱ्यांना याचा त्रास होत होता. याबाबत चौके ग्रामपंचायत येथे सरपंच पी. के. चौककर यांनी व्यापारी संघटनेतील सदस्य, चिरेखान व्यावसायिक यांची संयुक्त बैठक आयोजित केली.या बैठकीत बाजारपेठेतील समस्यांच्या बाबतीत सकारात्मक चर्चा होऊन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तत्काळ बाजारपेठेत लगेचच शनिवारी साफसफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी सकाळी सरपंच पी के चौकेकर, ग्राम अधिकारी श्री सरमळकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य दुल्हजी चौकेकर, जयश्री कदम, चिरेखान व्यवसायिक बिजेंद्र गावडे, सागर गोवेकर,संतोष गावडे,दत्ता गावडे, राजा गावडे नाना आंबेरकर, सलील गावडे, बाबू आंबेरकर यांच्यासह आदर्श व्यापारी संघ अध्यक्ष नितीन गावडे सचिव भाई आचरेकर, उपाध्यक्ष बाबू सावंत भूषण गावडे सुनील आंबेरकर, नाना देसाई यांच्यासह बाजारपेठेतील व्यापारी बंधू, ग्रामस्थ सदाशिव गावडे,विजय चौकेकर,अनंत चौकेकर, यांच्या सहभागातून बाजारपेठेतील कसाल – कुडाळ – मालवण मार्गावरील तिन्ही बाजूला रस्त्यालगत असलेला कचरा ट्रॅक्टरच्या सहाय्याने उचलण्यात आला त्यामुळे बाजारपेठेने काहीसा मोकळा श्वास घेतला तसेच रस्त्याच्या बाजूला खचलेली साईट पट्टी दगड मातीने उजवण्यात आली. याचबरोबर बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डेही बुजवण्यात आले. शनिवारी दिवसभर बाजारपेठेत केलेल्या साफसफाईमुळे नवीन झळाळी पाहायला मिळाली. दिवाळीपूर्वी करण्यात आलेली साफसफाई यामुळे चौके बाजारपेठेतील व्यापारी बांधव, ग्रामस्थ व वाहन चालक यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे व चौके ग्रामपंचायत आभार व्यक्त करण्यात आले.