बांदा l प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेतील मुलांच्या गटात इन्सुली नुतन माध्यमिक विद्यालयाच्या तीन खेळाडूंनी बाजी मारली आहे. या विद्यार्थ्यांची निवड कोल्हापूर विभागीय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे.
यामध्ये गोरक्ष राजेश आजगावकर, सखाराम शशिकांत खानोलकर व वृषभ विनय गावडे यांचा समावेश आहे. सदर स्पर्धा ३० ऑक्टोबर रोजी श्रीछत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल सातारा येथे होणार आहे. सदर विद्यार्थ्यांना सहाय्यक शिक्षक राजेश आजगावकर, विनोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विद्या विकास मंडळ इन्सुलीचे अध्यक्ष अशोक सावंत, सचिव गुरुनाथ पेडणेकर, खजिनदार सदानंद कोलगावकर, सर्व संचालक, सल्लागार व मुख्याध्यापक सुविद्या केरकर यांनी अभिनंदन केले आहे.












