*गावाचा विकास म्हणजे लोकांच्या आयुष्यातील सुखाचा नवा झरा”-आमदार शेखरजी निकम*
चिपळूण-: संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम यांच्या हस्ते मौजे धामेली येथील विहिरीच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.
या प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विहिरीच्या कामामुळे गावातील दीर्घकाळाची पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.
या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, पांडूशेठ माळी, रघुनाथ ठसाळे, राजेश गायकर, संदीप गायकर, समीर गायकर, अनिल भोजने, बाळ तटकरे, मनीष गायकर, सदानंद ठसाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी आमदार शेखरजी निकम म्हणाले, ग्रामविकास हा माझ्या कार्याचा केंद्रबिंदू असून, प्रत्येक गावात मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे.
धामेलीतील हे भूमिपूजन ग्रामविकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण आणि हृदयस्पर्शी पाऊल ठरणार आहे.











