नरकासुर स्पर्धेच्या बक्षिस रकमेतून जीवनावश्यक वस्तू खरेदी करून जिव्हाळा सेवाश्रमाला दिले भेट

वेंगुर्ले राऊळवाडा येथील जबरदस्त मंडळाचे आदर्शवत काम

वेंगुर्ले l दाजी नाईक :वेंगुर्ले शहरातील जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ राऊळवाडा या मंडळाचे काम हे नेहमी आदर्शवत असेच असते. मंडळाने नरकासुर स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून जीवनावश्यक वस्तू खरेदी करून ते जिव्हाळा सेवाश्रम (वृद्धाश्रम) पिंगुळी कुडाळ यांना भेट दिले.

जबरदस्त मित्रमंडळाने यावर्षी मोठा आकर्षक नरकासुर बनविला होता. त्यांनी नरकासुर स्पर्धेत सहभाग घेतला. या नरकासूर स्पर्धा मध्ये मिळालेले पारितोषिक रक्कम १२००० व व्यक्तित मिळालेली बक्षीसे सुमारे ४००० ही सर्व रक्कम मिळून १६००० रुपयांचे जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या. आणि सामाजिक बांधिलकी म्हणून या वस्तू जिव्हाळा सेवाश्रम (वृद्धाश्रम) पिंगुळी कुडाळ यांना भेट दिल्या. यावेळी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळाच्या या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.