लांजा तालुक्यातील तेली समाजाचा आक्रमक पवित्रा
लांजा (प्रतिनिधी):मराठा समाजाला दिलेल्या ओबीसी आरक्षणा संदर्भातील जीआर शासनाने तातडीने रद्द करावा, अशी मागणी लांजा तालुक्यातील तेली समाजाने केली असून याबाबतचे निवेदन आज श़ुक्रवारी लांजा तहसीलदारांना सादर करण्यात आले.
मराठा समाजाला दिलेल्या ओबीसी आरक्षणाविरोधात लांजा तालुक्यातील तेली समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे.यासाठी शुक्रवारी लांजा तालुका तेली समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांना लांजा तहसीलदार यांच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये म्हटले आहे की हा काळा जीआर ओबीसी समाजाच्या मुळावर उठणार आहे. ज्या तेली समाजाने विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला भरभरून मतदान केले, ज्या समाजाच्या जीवावर सरकार स्थापन झाले. अशाच वेळी एक व्यक्तीच्या धमकीला घाबरून सरकारने संपूर्ण ओबीसी समाजावर अन्याय केलेला आहे
सरकारच्या या चुकीच्या जीआर मुळे तेली समाजातील युवकांना नोकरीमध्ये संधी मिळणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना मोठे शैक्षणिक नुकसान सोसावे लागणार आहे. त्यामुळे हा जीआर तातडीने रद्द करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे
निवेदन सादर करताना तेली समाजाचे अध्यक्ष प्रकाश लांजेकर, राजेश लांजेकर, गुरुप्रसाद तेली, योगेश लांजेकर, नवनीत लांजेकर,रामचंद्र लांजेकर, संदीप चव्हाण, अमोल शेलार, संजय लांजेकर, चंद्रकांत रहाटे, रामदास लांजेकर, लहू लांजेकर, सतीश पावसकर, महेश लांजेकर, विष्णू चव्हाण,सुशांत रहाटे,अमित लांजेकर,वसंत राऊत, श्रीकांत लांजेकर, वैभव लांजेकर, किरण लांजेकर ,रोहन लांजेकर, तुषार लांजेकर, संदीप लांजेकर, संकेत लांजेकर, सागर जावडेकर यांच्यासह लांजा तालुक्यातील अनेक तेली समाजाचे बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते









